गडचिरोली : राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ दिनांक ११-०१-२०२३ ते १७-०१-२०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज दिनांक १६-०१-२०२३ रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांनी वॉकेथॉनचे आयोजन केलेले होते. सदर वॉकेथॉन आय.टी.आय. ते कोर्ट चौक वरुन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सांगता करण्यात आली. त्यानंतर सर्वांना रस्ता सुरक्षेपर शपथ देण्यात आली.सदर वॉकेथॉनमध्ये पोलीस विभाग, वाहतुक शाखा, गडचिरोली येथील सहा. पोलीस निरीक्षक पूनम गोरे संपूर्ण टिमसह उपस्थित होत्या. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथील शिक्षक भास्कर मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली २०० प्रशिक्षणार्थी व शिक्षक उपस्थित होते. वॉकेथॉनमध्ये मोटार वाहन निरीक्षक वैष्णवी दिघावकर, सहा. मोटार वाहन निरीक्षक एच. डब्ल्यू गावंडे, सहा. मोटार वाहन निरीक्षक के. एस. पारखी, सहा. मोटार वाहन निरीक्षक एच. सी. काळे, सहा. मोटार वाहन निरीक्षक जी. एच. खराबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षल बदखल यांनी केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वॉकेथॉनचे आयोजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com