नागपूर :- मतदार नोंदणी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रियदर्शिनी भगवती कॉलेजमध्ये ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ स्थापित करण्यात आला. यात मिशन युवा इन अभियानांतर्गत 21 युवा अॅम्बेसिडरची नियुक्ती करण्यात आली. या अभियानाकरिता कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. के. चौधरी हे नोडल अधिकारी व प्राध्यापिका वर्षा अतकरी या सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवार 23 ऑगस्ट रोजी याअनुषंगाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार श्रीराम मुंदडा उपस्थित होते व त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीचे महत्व व त्यांच्या जबाबदाऱ्या या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला 400 पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी कॉलेजच्या डीन डॉ. ए. आर. चौधरी व प्रबंधक खेडीकर व अन्य प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा विचार व अर्जुन पाली यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्राध्यापिका वर्षा अतकरी यांनी केले.