कामठी येथे तीन दिवसीय ऊर्स चे आयोजन..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :– सैय्यद शाह शैदाये दर्गाशरीफ भाजी मंडी कामठी येथे उर्स शनिवार (दि. १०) ते दि. १२ सप्टेंबर पर्यंत आयोजन करून तीन दिवसीय उर्स साजरा करण्यात येणार आहे.

भाजी मंडी कामठी येथील सैय्यद शाह शैदाये दर्गाशरीफ येथे आज शनिवारला दि. १० सप्टेंबर ला सकाळी जियारते तबरुकात, गुसल मजार शरीफ, बाद कुरआन ख्वानी, बाद नमाजे जोहर परचम कुशाई दुपारी ३ वाजता संदल शरीफ साजरा करण्यात येईल. तसेच दि११ सप्टेंबर रोज रविवार ला मटका पार्टी मुकाबला, व दि १२ सप्टेंबर रोज सोमवार ला साय ७ वाजता राहत चिस्ती व नईम असलम अजमेरी यांचा कव्वाली मुकाबला आयोजित करण्यात आले आहे.

सैय्यद शाह शैदाये दर्गाशरीफ येथे दर वर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळ असल्याने उर्स साजरा करण्यात आला नाही अता सर्व प्रतिबंध समाप्त झाल्याने शहरात उर्स मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे यात विविध कार्यकर्मांचे हि आयोजन करणयात आले आहे असे आयोजक उर्स कमेटी चे किशोरी बाबा गद्दीनशिन यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रात्री अचानक भिंत कोसळल्याने तीन जन गंभीर जखमी...

Thu Sep 8 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी सर्वांना गोंदिया च्या सामान्य रुग्णालयात भरती  गोंदिया –  जिल्ह्यातील टिरोडा तालुका अंतर्गत येत असलेल्या परसावडा येथील बावनकर कुटुंबीय रात्री झोपले असता अचानक मध्य रात्री भिंत पडल्याने बावनकर यांच्या कुटुंबियातील तिन जन गंभिर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालया उपचारा साठी भर्ती करण्यात आले आहे. जखमी झाल्या मध्ये रामजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com