भंडारा :- आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्यल असीम श्रध्दा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रमाणिकपणा व पारंपारीक निखळ गुणाचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर 9 ऑगस्ट 2023 रोजी हा एक जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो.हा दिवस महाराष्ट्रातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.
तसेच बुधवार 9 ऑगस्ट,2023 रोजी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यत जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रकल्प कार्यालय,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यांचे वतीने लक्ष्मी सभागृह जे.एम.पटेल कॉलेज समोर त्रिमुर्ती चौक,येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आदिवासी बांधवासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रामाचे प्रमुख जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,यांचे शुभहस्ते उदघाटन होणार आहे.तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त आदिवासी बांधवानी उपस्थित राहुन यांचे लाभ घ्यावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी,निरज मोरे,आदिवासी विकास प्रकल्प यांनी कळविले आहे.