‘ऊर्जा कार्यक्षम प्रकल्पांच्या वित्तपुरवठ्याची गुंतवणूक बाजार’ विषयावर परिषदेचे आयोजन

नागपूर :-  ऊर्जा कार्यक्षम प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी तसेच अडथळे दूर करण्यासाठी एनर्जी एफिशिअन्सी फायनान्सिंग प्लॅटफार्मअंतर्गत ऊर्जा दक्षता ब्युरो, नवी दिल्ली व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यावतीने “ऊर्जा कार्यक्षम प्रकल्पांच्या वित्तपुरवठ्यासाठी गुंतवणुक बाजार” या विषयावर एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.

महाऊर्जाचे महाव्यवस्थापक पंकज तागडपल्लेवार यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रादेशिक संचालक वैभव पाथोडे, अमरावती विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे, ऊर्जा दक्षता ब्युरोचे संचालक विनीता कानवाल, सिडबी व्यवस्थापक विनय अहीरवार आदी यावेळी उपस्थित होते

विजय तागडपल्लीवार यांनी कार्यशाळेच्या आयोजनबाबत उपस्थितांना माहिती दिली. महाऊर्जाचे प्रादेशिक संचालक वैभव पाथोडे यांनी पर्यावरण बदलांबाबत इजिप्त मध्ये COP२७ बैठकीत झालेल्या निर्णयाबद्दल कळविले.

या कार्यशाळेत विविध उद्योग, ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचे उत्पादक, वित्तीय संस्था, बँका, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन व ऊर्जा परीक्षक यांचे प्रतिनिधी, पुणे, नागपुर, चंद्रपुर तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यातील पदनिर्देशित संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला. उत्पादकांकडून त्यांच्या ऊर्जा कार्यक्षम उत्पादनाविषयी माहिती देण्याकरीता व विविध बँकाद्वारे वित्त पुरवठाबाबत योजनांची माहिती देण्याकरिता स्टॉल उभारण्यात आले होते.

महाऊर्जाचे महासंचालक, रविंद्र जगताप, अपर महासंचालक सुरज वाघमारे यावेळी उपस्थित होते. संचालक श्रीमती विनीता कानवाल यांनी उपस्थितांना ऊर्जा संवर्धनसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. अमरावतीचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी आभार मानले.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिव्यांगत्व प्रमाणपत्र मोहिम सप्ताहाला सुरूवात

Fri Dec 2 , 2022
राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त ६ डिसेंबरपर्यंत आयोजन : पहिल्याच दिवशी ३४० दिव्यांगांची नोंदणी नागपूर :- नागपूर महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नागपूर आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांगत्व प्रमाणपत्र विशेष शिबिराला सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (ता.१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com