नागपूर :- स्व.पं.श्रीधर पार्सेकर व पं. विष्णुपंत कावळे स्मृती प्रीत्यर्थ रविवार. दि. 25 व सोमवार 26 फेब्रुवारीला दोन दिवसीय व्हायोलीन मोहोत्सवाचे श्रीगुरुदेव सेवामंडळ, नागपूर यांचे संतुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येत आहे.
या महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक, वादक आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. 25 फेब्रुवारी रोजी, सायंकाळी 5.00 वाजतापासून कार्यक्रमाचा शुभारंभ प्रवीण कावळे यांचेसह शिष्यगणांच्या व्हायोलीन वृंदवादनाने होणार असून तद्नंतर पं. विवेक नवरे, खैरागड यांचे सरोद वादन, विदर्भाचे प्रख्यात गायक पं. गुणवंत घटवाई यांचे शास्त्रीय गायन व पं. संतोष नाहर, दिल्ली यांचे व्हायोलीन वादन होणार आहे. तसेच, दि. 26 फेब्रुवारी रोजी व्हायोलीन वादक प्रवीण कावळे यांचे व्हायोलीन वादन, ऑस्टिनचे (USA) प्रख्यात तबलावादक पं. गौरीशंकर कर्माकर यांचे एकल वादन व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले व्हायोलीन वादक पं. इंद्रदीप घोष, कोलकाता यांच्या व्हायोलीन वादनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. राम खडसे, वेद ढोक, महेंद्र कदम व गोविंद गडीकर यांची साथसंगत लाभणार आहे. महोत्सवाचे आयोजन श्रीगुरुदेव सेवामंडळ, सुभाष रोड, नागपूर येथे होणार असू प्रवीण वि. कावळे व मित्र परिवाराने सर्व संगीत प्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहून संगीतमय संध्येचा आनंद घ्यावा यासाठी आमंत्रित केले आहे.