नागपूर :- चिंता आणि तणाव हे आजकालच्या तरुणांच्या मनातील आणि कार्यरत व्यावसायिकांचे आयुष्यातील घटक आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भाजयुमो नागपूरने मध्य भारतातील आघाडीचे मानसशास्त्रज्ञ डॉ. शिशिर पळसापुरे यांच्यासोबत एक विशेष सत्र मॉर्फिक माईंड्स, ट्राफिक पार्क जवळ, धरमपेठ येथे आयोजित केले होते. यामध्ये भाजपचे नागपुर महानगर अध्यक्ष बंटी कुकडे, भायजुमो शहर अध्यक्ष बादल राऊत मार्गदर्शनात हे सत्र पार पडले.
भाजयुमो पि.आर.टी. प्रमुख सुलभ देशपांडे व भाजयुमो शहर उपाध्यक्ष प्रणव घुगरे यांच्या नेतृत्वात व भाजयुमो उद्योजक विकास मंचचे सदस्य गोपी मोटघरे, हर्षवर्धन फुके, प्रशांत रायपूरकर, हुजेफा धामणगाववाला, अभिषेक काणे, अभिषेक देशपांडे, देवाशिश अग्रवाल, अक्षय कुंभारे, श्रेयस बोरीकर, राधा नानोटी, सुखदा सातपुते, श्रीकांत अर्धापूरकर, काव्या राय आदी उपस्थित होते.