अफार्म पुणे ,फिक्की व ग्राम विकास संस्था भंडाराचा सयुक्त उपक्रम
भंडारा :-अफार्म पुणे ,फिक्की व ग्राम विकास संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगाव ता.जि.भंडारा येथे दि. ०४ जानेवारी २०२३ ला हवामान अनुकूल-अल्पखर्चिक शाश्वत शेती तंत्रज्ञान प्रचार प्रसार अभियानांतर्गत शेतकरी मेळावाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.प . मंडणगाव चे सरपंच हर्षवर्धन घोनमोडे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.प.सदस्या प्रिती निबार्ते वन समितीचे अध्यक्ष हरिष पंचबुद्धे, त.मु.स अध्यक्ष हगरु सार्वे व कृषी सहाय्यक उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून दिलीप बिसेन संस्थाध्यक्ष/साधन व्यक्ति, डॉ. संदिप कामडी , मोहरी पैदासकर कृषी महाविद्यालय नागपूर, सुरेश टिचकुले प्रगतशिल शेतकरी /साधन व्यक्ति इ. उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे संस्थाध्यक्ष/ मार्गदर्शक यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी , संकल्पना, गरज व महत्व विस्ताराने सांगीतले. त्यामध्ये अल्प खर्चिक शेती पद्धती अन्न द्रवाच्या कमतरतेची बाहय लक्षणे व उपाय, मातेचे आरोग्य, सुधारणा उपाय योजना जसे माती परिक्षण, बिजप्रकिया, जीवामृत हिरवळीचे खत आणि सेद्रीय पोषण बाग इ. विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर साधन व्यक्ती/ प्रगतशिल शेतकरी सुरेश टिचकुले यांनी हवामान बदलाचे शेतीवर होणारे दुष्परिणाम सांगून त्यावर मात करण्यासाठी नव नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करावे व येणार्या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकर्यानी संघटीतपणे लढा देण्याची गरज विषद केली. सेंद्रीय शेती व रासायनिक शेती ची सांगड घालून उत्पादन व उत्पन्न वाढविण्यावर भर दिला पाहिजे असे सांगीतले. त्यानंतर कृषी महाविद्यालय चे मोहरी पैदासकर डॉ संदिप कामडी यांनी मोहरी बाबत बियाणे लागवड संवर्धन कापणी मळणी व बाजारपेठ बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप करताना सरपंच यांनी ग्रामपंचायत स्तरावर शेतकर्यांना जे सहकार्य करता येईल ते करणार व शेतीच्या अनेक योजना गावात राबविणार व शेतकर्यांना नविन तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रेरीत करणार असे सांगीतले. त्याच प्रमाणे यावेळी हवामान बदलाचे शेतीवर होणारे दुष्परिणाम , गांडूळ खत कसे तयार करावे , अझोला हायड्रो पोनिक व अन्य महत्वपूर्ण माहिती असलेले पोस्टर्स प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सहभागी शेतकर्यांना पॉकीट डायरीचे वाटप करण्यात आले. या शेतकरी मेळाव्यात गावातील ७० अल्प भूधारक, सिमांत व मध्यम वर्गीय शेतकरी उपस्थित होते. श्याम भालेराव यांनी सर्वाचे आभार मानले.