स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.13) 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत टेलिफोन एक्सचेंज चौक येथील राजेश ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रभाग क्र.20, चंकना चौक येथील योगेश प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत कच्चीविसा येथील राहुल कच या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत सदर येथील रिलायन्स जिओ इन्फॉर्म प्रा.लि.यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सदर येथील Domino’s Pizza आणि वि.सि.ए.मैदानाजवळील सदर येथील Checkers Café यांच्याविरुध्द खाद्यपदार्थ/जेवणाचा कचरा रस्त्यालगत फेकल्याबद्दल कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत प्रभाग नं.34, ओमकारनगर चौक येथील गांधी बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नेहरुनगर झोन अंतर्गत दत्तात्रयनगर येथील सुनिता राजेन्द्र सेंगर यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगलवारी झोन अंतर्गत अनंतनगर चौक, जाफर नगर येथील White House Buildicon यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मानकापूर चौक येथील जनाब नासिर शेख यांच्याविरुध्द रस्त्यालगत मोठया प्रमाणात कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com