भंडारा दि.27: क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद,भंडारा यांचे विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.29 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
युवा महोत्सवमध्ये लोकगीत व लोकनृत्य् या दोन कलांचा समावेश राहणार असून लोकगीत साठी साथसंगत देणाऱ्यासह जास्तीत जास्त् दहा स्पर्धक व लोकनृत्य् या स्पर्धामध्ये वीस प्रत्येक सहभागी होऊ शकते.या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक व साथसंगत देणाऱ्याचे वय 15 ते 29 या वयोगटात असणे आवश्य्क आहे. लोकनृत्य् सादर करणाऱ्या संघाने पुर्वाध्वनीमुदित टेप अथवा रेकोर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही. तसेच लोकगीत सादर करणाऱ्या संघाचे गीत व लोकनृत्य् चित्रपटबाहय असावे.
स्पर्धेसाठी प्रवेशिका 28 डिसेंबर, रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,भंडारा यांचेकडे वयाच्या दाखल्यासह सादर करावी. त्यानंतर येणाऱ्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही. वेळेवर कोणत्याही संघास व कलाकारास स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी.आशा मेश्राम यांनी कळविले आहे.
या उपक्रमाची नोंद घेवून अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,भंडारा येथे संपर्क साधण्यात यावा. संपर्क क्र. 9850789180, 8999705415