औरंगाबादमध्ये पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु करणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नागपूर, दि. २७ : महिलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु केले जाईल, अशी घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत केली.

सदस्य सतीश चव्हाण यांनी महिला कृषी महाविद्यालय सुरु करण्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री सत्तार बोलत होते.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, “राज्यात ४८ शासकीय आणि अनेक खासगी कृषी महाविद्यालये आहेत. या प्रत्येक महाविद्यालयामध्ये महिला प्रवेशासाठी ३० टक्के जागा राखीव करण्यात आल्या आहेत. महिलांच्या कृषी क्षेत्रातील शिक्षणासाठी औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये खास बाब म्हणून पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु केले जाईल. यासोबतच औरंगाबादमध्ये उप कृषी विद्यापीठ सुरु करण्याबाबत समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल”, असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोरोनाशी झुंज देण्यासाठी मनपा प्रशासन पूर्णतः सज्ज

Tue Dec 27 , 2022
– मॉकड्रीलच्या मदतीने घेतला रुग्णालयांच्या तयारीचा आढावा  नागपूर २७ ता : जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांनुसार नागपूर महानगरपालिका कार्य करीत आहेत. मनपाद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, शासनाच्या निर्देशानुसार मंगळवार (२७ता) कोरोनावर उपचार देणाऱ्या सर्व रुग्णालयांतील तयारी तपासण्यासाठी मॉकड्रील घेण्यात आली. त्यानुसार कोरोनाशी झुंज देण्यासाठी मनपा प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे दिसून आले. राज्यातील सर्व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com