नागपूर :- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या विणकर सेवा केंद्रामार्फत उद्या 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे जिल्हा हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन 18 ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी 05.30 वाजता , महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त गोरक्ष गडलीकर, यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रदर्शनात हात मागाद्वारे निर्मित टसार, नागपूर कॉटन साडी, कॉटन करवती साडी, चंदेरी साडी, वाराणसी साडी, कॉटन बेड सीट, फर्निशिंगचे कापड प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध असतील.
हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत खुले राहणार आहे. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन विणकर सेवा केंद्र नागपूरचे उपसंचालक एस.पी. ठुबरीकर यांनी केले आहे.