– मनपातर्फे गणेशोत्सव सजावट/ देखावे व सौंदर्यीकरण पंधरवाडा स्पर्धा
– २ टप्यात होणार स्पर्धा
– १ लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक
चंद्रपूर :- येत्या १९ सप्टेंबर रोजी सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातुन स्वच्छता व सौंदर्यीकरणाद्वारे समाजासाठी योगदान देण्याची युवावर्गाला संधी प्राप्त होणार असल्याने अधिकाधिक गणेश मंडळांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी आज मनपा सभागृहात आयोजीत माहीती सभेत केले.
मनपा स्वच्छता विभागातर्फे सदर स्पर्धा ही २ टप्यात राबविली जाणार असुन १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव सजावट/ देखावे स्पर्धा तर सौंदर्यीकरण पंधरवाडा ०२ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान घेण्यात येणार आहे. सजावट/ देखावे स्पर्धेत चौकात पर्यावरण पूरक मूर्ती व सजावट,ध्वनिप्रदूषण रहित वातावरण,आवश्यक सर्व शासकीय परवानग्या घेणे,सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा,निर्माल्यपासुन खत निर्मिती,परिसराची स्वच्छता व शिस्त राखणे,सामाजीक संदेश देणारे देखावा तयार करणे इत्यादीवर ४० टक्के गुणांकन देण्यात येणार आहे.
तर सौंदर्यीकरण पंधरवाडा स्पर्धेत परिसरात उपलब्ध भिंतीवर / जागेवर पेंटिंग करणे,माझी वसुंधरा चा लोगो व पंचतत्व लोगो लावणे / पेंटिंग करणे,वृक्षारोपण,टाकाऊ पासुन टीकाऊ वस्तु बनविणे,किल्ला स्वच्छता करणे,लोकसहभागातुन सौंदर्यीकरण / बेंचेस / ट्री गार्ड / शिल्प / कारंजे उभारणे,दुकानांमध्ये डस्टबिनचा वापर करणे इत्यादींवर ६० टक्के गुणांकन दिले जाणार आहे.
नोंदणी करण्यासाठी – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdHvFErp5xCqI2TooSGX9YxiADwB5yq2y9BZgtQWggJ_6Kemw/viewform या लिंकद्वारे गुगल फॉर्म भरावा अथवा मनीषा कन्नमवार – 8329352842, साक्षी कार्लेकर – 7498954976 या क्रमांकावर संपर्क साधावा.
अटी व शर्ती :-
मंडळ हे धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी केलेले असावे किंवा महानगरपालिका चंद्रपूर यांची परवानगीधारक असणे बंधनकारक आहे.
मंडळ चंद्रपूर शहरातील असावे
सजावट/देखावा साठी कोणतेही साहित्य मनापाद्वारे पुरविण्यात येणार नाही.
सौंदर्यीकरणासाठी जागा ही चौक किंवा सार्वजनिक स्थळ/जागा असावे.
मनपा तर्फे झाडे व पेंटिंग कलर मर्यादित) पुरविण्यात येईल.
स्पर्धा गटाच्या सह्भागीतेवर बक्षीस रक्कम व रोख रक्कम कमी / जास्त करण्याचा अधिकार मनपाकडे राहील
बक्षिसे :
प्रथम पारितोषिक – १ लक्ष व ट्रॉफी व सन्मानपत्र.
द्वितीय पारितोषिक – ७१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.
तृतीय पारितोषिक – ५१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.
टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविणे – २१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.
प्रोत्साहनपर १० पारितोषिक – २१ हजार व ट्रॉफी व सन्मानपत्र.