बारावीच्या निकालात मनपाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, ९५.५८ टक्के निकाल: तिन्ही शाखांमध्ये मुलीच अव्वल

नागपूर :- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, बारावीच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.              कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांमधून मनपाने ९५.५८ टक्के निकालाची कामगिरी नोंदविली आहे. बारावीत घवघवीत यश संपादित करीत मनपाच्या महाविद्यालयाचे, शिक्षकांचे व पालकांचे नावलौकीक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना गुरुवारी (ता.२५) मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सन्मानित करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात आयोजित छोटेखानी समारंभात मनपाचे उपायुक्त सुरेश बगळे, शिक्षणाधिकारी  राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त राधाकृष्णन बी यांनी सांगितले की, प्रत्येकात एक कौशल्य आहे, आता यापुढे आले क्षेत्र निवडताना आपल्या आवडीनुसार क्षेत्राची निवड करावी, स्वतःची तुलना करू नये, तज्ज्ञाचे व वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शन घ्यावे. आपला कौशल्यात्मक विकास कसा होईल याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. तसेच अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने यांनी लहान लहान उद्दिष्ट ठेऊन पुढे वाटचाल करावी असे मार्गदर्शन केले तर अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयातुन सुजाण नागरिक घडावा असे मार्गदर्शन केले.

बारावीच्या परीक्षेत मनपाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिन्ही शाखेमध्ये उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले असून, विज्ञान शाखेमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी भक्ती राजू ठवरेने ७२ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर वाणिज्य शाखेत एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी समीरा फिरदोसने ६९.३३ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तर कला शाखेतून एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्शिया अंजुम निरसाने ७५. ५० टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच दिव्यांगमधून विज्ञान शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवम सिरसलाल उरकुडेने ५२ टक्के गुण प्राप्त केले आहे. याशिवाय मागासवर्गीयमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या ऋतुजा सिद्धार्थ पाटील हिने ५३. १७ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

बारावीच्या परीक्षेत मनपाच्या चारही कनिष्ठ महाविद्यालयांचा एकूण निकाल ९५. ५८ टक्के एवढा लागला असून, यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा ९१. १७ टक्के, साने गुरूजी उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा ९०. ९० टक्के, ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा९६. ८७ टक्के तर एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रत्येकी ९७.८७ टक्के निकाल लागला आहे. याप्रसंगी सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी आभार मानले.

विज्ञान शाखा निकाल :

प्रथम: भक्ती राजू ठवरे- ७२ टक्के गुण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय

व्दितीय तीय: झिकरा फातीमा अन्वरजलील- ७०. ८३ टक्के गुण- एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय

तृतीय : कैकशा बेगम मुजफ्फर बेग – ५७ टक्के गुण- एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय

वाणिज्य शाखा निकाल:

(सर्व एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय)

प्रथम:- समिरा फिरदोस- ६९. ३३ टक्के गुण

व्दितीय: – मकसूद अहमद – ६६ . ३३ टक्के गुण

तृतीय :- सना ‍फिरदोस – ६० . १५ टक्के गुण

कला शाखा निकाल: 

प्रथम : हर्शिया अंजुम निरसा – ७५. ५० टक्के गुण एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय

व्दितीय : अमरीन परवीन ६८. ६७ टक्के गुण एम.ए.के. आझाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय

तृतीय: नगमा साकीबाद बारा हुसैन साज ६२ . ५० टक्के गुण साने गुरूजी उर्दू कनिष्ठ महाविद्यालय

दिव्यांग मधून विज्ञान शाखा: 

– शिवम सिरसलाल उरकुडेने ५२ टक्के गुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय

मागासवर्गीय मधुन प्रथम

ऋतुजा सिद्धार्थ पाटील ५३. १७ टक्के गुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय

NewsToday24x7

Next Post

गोवा में 27 मई को ‘विविधता, सर्वसमावेशिता एवं परस्पर सम्मान’ इस विषय पर ‘सी 20’ परिषद !

Fri May 26 , 2023
आध्यात्मिक मार्ग से विश्व की सभी समस्याओं का समाधान संभव होने से ‘सी 20’ परिषद में सम्मिलित हों ! – प्रा. डॉ. शशी बाला, अंतरराष्ट्रीय समन्वयक, ‘सी 20’ पणजी  :- विश्व के अनेक देश भारत की अपेक्षा अधिक संपन्न, साथ ही संपत्ति, शस्त्रास्त्रों एवं विकास में बहुत आगे हैं; परंतु भारत अध्यात्म क्षेत्र का गुरु है । अध्यात्म भारत की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com