ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्रात चैत्र पौर्णिमा निमित्त एक दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्रात 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत एक दिवसीय ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दर पौर्णिमेला एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने चैत्र पोर्णिमेच्या निमित्ताने 23 एप्रिल 2024 ला आयोजित एक दिवसीय ध्यान शिबीरात किमान एक दहा दिवसीय शिबीर केलेल्या साधकांना थेट सहभागी होता येईल.

उल्लेखनिय आहे की दर महिन्याला 10 दिवसीय व 3 दिवसीय निवासी शिबीर व दर पौर्णिमेला 1 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येत असून इच्छुक साधकांना http://forms.gle/HWfPAahSQkXLnRw3Aया वेबसाईट वर ऑनलाईन नोंदनी करता येईल अशी माहिती ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्राच्या प्रमुख ऍड सुलेखा कुंभारे यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आरटीईची मोफत प्रवेश नोंदणी 30 एप्रिल पर्यंत

Mon Apr 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अनव्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकाकरिता स्थानिक स्वराज्य संस्था,अनुदानित, विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्य शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे.यासाठी 16 एप्रिल पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.पालकानो आपल्या पाल्याचे ऑनलाईन नोंदणी 30 एप्रिल पूर्वी करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे यांनी केले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com