संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठीता प्र 13 :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे एक दिवसीय सामुहिक ध्यान साधना शिबीराचे आयोजन आज बुधवार दिनांक 13/07/2022 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 4:00 वाजे पर्यंत करण्यात आले होते. या एक दिवसीय ध्यान साधना शिबीरात मोठया प्रमाणात साधकांनी सहभाग घेवून शिबीराचा लाभ घेतला.
ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे नियमित 10 दिवसीय, 3 दिवसीय व प्रत्येक पौर्णीमेला 1 दिवसीय शिबीराचे आयोजन केल्या जाते. तसेच रोज सकाळी 8:00 ते 9:00 वाजता पर्यंत ग्रुप मेडिटेशन करण्यात येते.
उल्लेखनीय आहे की, जेष्ठ गुरू पौर्णिमे निमित्ताने 3 महीण्याचे वर्षवासाला प्रारंभ होत असते. या काळात पुज्यनीय भिक्खुसंघ आप- आपल्या विहारात निवास करतात. तसेच विपश्यना ध्यान साधनेचे प्रशिक्षण देतात. वर्षवाषाच्या काळात मोठया प्रमाणात बौद्ध उपासक – उपासिका आर्य अष्ठ शिलाचे पालन करून धम्मदेसना व विपश्यना ध्यान साधनेचा लाभ घेतात.