नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी प्रलंबित तक्रारींचा आढावा घेण्यात आला आणि एक तक्रार निकाली काढण्यात आली.
उपायुक्त घनश्याम भुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिन पार पडला. उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.