पुन्हः एकदा अंधेरे मे एक प्रकाश जयप्रकाश – जयप्रकाश !

सन 1975-77 मध्ये काँग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने स्वतःचा बचाव करण्याकरिता देशात 25 जून 1975 ला आणिबाणी लावली त्या विरोधात लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी आणिबाणीचा निषेध करून जनआंदोलन पुकारले. त्यांत अटलबिहारी बाजपेई, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, पण्णालाल सुराणा, निहाल अहमद इत्यादी जेष्ट नेत्यांना रातोरात कारागृहात बंद केले.

संपूर्ण भारत भर घटनेतील सामान्य जनतेचे मुलभूत अधिकारावर गदा आलेमुळे जनतेचे सप्तस्वातंत्र हिरावून घेतल्यामुळे जनतेने अंधेरेमे एक प्रकाश-जयप्रकाश, जयप्रकाश हया नाऱ्यामुळे आसंमत भारत पेटला, जागोजागी आंदोलन झालीत कार्यकर्त्यांना काही कारण न देता चार्च शिट मध्ये गुन्हा न दाखवता जेल मध्ये डांबण्यांत आले.

तद्नंतर DIR, MISA वगैरे ACT खाली नमुद करून अनेक महिणे तर काहिना 14,16-19 महिने कारागृहात ठेवल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची धुडघान झाली, काहींचे नुकतेच लग्न झाले व दुसऱ्या दिवशी कारागृहांत जावे लागले, काहिंचे घटस्पोटही झाले, सामान्यांचे उद्योग धंदे, शेतीव्यवसाय यांना आळा बसला, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

तद्नंतर 21 मार्च 1977 च्या काळात शासन बदलले तेव्हापासून हया अशा बेघर झालेल्या योध्दयांना शासकिय काही सोई सवलतीचा फायदा मिळून त्याचे पुर्नवसन व्हावे त्यांना समाजात परत सन्मानाने जगता यावे म्हणून अनेकदा निवेदने दिलेली आहेत. परंतु त्यावर कायमचा तोडगा शासनाने काढला नाही. मात्र काही मोजके कार्यकर्ते पदाधिकारी स्वतःच्या ईच्छा तृप्तीचा खेळ खेळत समृध्द होत आहेत.

सन 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारने हया अश्या सेनानीना जुजबी सन्मान निधी देवून बोळवण केली जखमेवर मिठ चोळले आज मितीला त्याचे वय 70 ते 90 वर्षांच्या घरात असून अंथरूनावर किचपत पडलेले आहेत ना घड, औषधोपचाराची व्यवस्था ना खाण्यापिण्याची, लोकतंत्र सेनांनी संघाकडून मध्यप्रदेश सरकारच्या वर्तीवर सन्मान निधी देवून उपवृत्त करावे अशी अनेक निवेदने युती सरकारला दिलेली आहेत. युपी, बिहार, छ. गढ, हरियाना, ओरिसा, इ. राज्यानी हया अश्या सेनानींना निधी देवून योग्य सन्मान केलेला आहे. तिथे बहुमतानी त्याचे सरकार निवडून आलेले आहे.

लोकतंत्र सेनानीचा आशिर्वाद घ्या !

महाराष्ट्रातील लोकतंत्र सेनानी अतृप्त, असमाधानी, नाराज असल्यामुळे शिवाय युतितील पदाधिकारी, मंत्री उपमुख्यामंत्री, मुख्यमंत्री हयांचे सदर विषयी चर्चा संभाषण नसल्यामुळे लोकसभेमध्ये युतीला संभाभ्य ध्येय गाठता आले नाही. हयावट तोडगा निघाला, नाहीतर येणाऱ्या विधान संभेलाही हया योध्दयाचा आशिर्वाद मिळणार नाही व युतीचे सरकार बनणार नाही.

लोकतंत्र सेनानी संघ विधान सभेच्या आखाड्यांत.

महाराष्ट्रातील लोकतंत्र सेनानी सध्या नाराज असल्यामुळे विधान सभेत आपले विषय मांडणारे लोकप्रतिनिधी असावेत असे वाटत असल्यामुळे येत्या विधान सभेत 250 जागा लढविण्याचा विचार पक्का केलेला आहे. 200 जागाचा सर्वे पूर्ण झाला असून उर्वरीत जागेचा अहवाल प्रतिनिधी कडून लवकर पूर्ण होणार आहे. नागपूरात देवेंद्र गंगाधर फडणवीस च्या विरोधात अॅड, भगवान मधू कोलते हे निवडणूक लढविणार आहेत. तर चिमुर विधान सभेत बाळासाहेब सिरास हे उमेदवार असतील असे अधिक्रूत सागण्यांत आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 66 प्रकरणांची नोंद

Fri Sep 13 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरूवार (12) रोजी शोध पथकाने 66 प्रकरणांची नोंद करून 52,500/- रुपयाचा दंड वसूल केला.हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com