जिल्हास्तरीय युवा उत्सव उत्साहात साजरा

भंडारा :- नेहरू युवा केंद्राच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक 14 ऑक्टोंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या संग्रामातील देशभक्तीची भावना रुंदगीत करणे आणि तरुण युवक कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे उद्देशाने चित्रकला, कविता लेखन, छायाचित्रण, भाषण स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम व जिल्हा युवा संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे, नगर परिषद माजी उपाध्यक्ष आशुतोष गोंडाने, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य, रमेश अहिरकर, प्रगती महिला महाविद्यालय प्राध्यापक डॉ. श्यामकुमार चरडे, संस्थापक डिफेन्स अकॅडमी शहापूर येथील प्रा. नरेंद्र पालांदुरकर, माजी उपनिदेशक नेहरु युवा केंद्र महाराष्ट्र शरद साळुंखे, प्राध्यापक लुटे, नेहरू युवा केंद्र भंडारा चे राष्ट्रिय स्वयंसेवक अतुल गेडाम, कोयल मेश्राम, सौरभ बोरकर, छाया रासेकर, अनिल मुंडले, नरेश सावरबांधे, रुपाली मेश्राम, ज्योती चौधरी, जयश्री बिसने, प्रशांत नागपुरे, सुर्यकांत मरघडे उपस्थित होते.

कार्यक्रमात जिल्हा स्तरीय भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक अतुल गेडाम, द्वितीय क्रमांक पानेरी निखाडे, तृतीय क्रमांक भारत मेश्राम, छायाचित्र प्रदर्शनी स्पर्धेत प्रथम क्रमांक मोहित मेश्राम, द्वितीय क्रमांक सचिन राखणे, तृतीय क्रमांक डिंपल कापगते, चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक वेद धकाते, द्वितीय क्रमांक जास्मिन डोंगरे, तृतीय क्रमांक मानसी झोडे, कविलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मेघा मिश्रा, द्वितीय क्रमांक भाग्यश्री नंदेश्वर, तृतीय क्रमांक शुभम ठवकर या विजेत्या स्पर्धकांचा स्मृतिचिन्ह सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पहिला क्रमांक आदिवासी ग्रुप चिखली, दुसरा क्रमांक योगा ग्रुप लाखनी ,आणि तिसरा क्रमांक फ्रीडम युथ फाऊंडेशन साकोली या ग्रुपने पटकाविले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्राध्यापक पितांबर उरकुडे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दहशतवादाशी लढा देणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता - सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस

Wed Oct 19 , 2022
मुंबई :- दहशतवादाशी लढा देणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस यांनी केले. सरचिटणीस  गुटेरेस यांनी आज हॉटेल ताज येथे भेट देऊन 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. या निमित्ताने आयोजित चित्रप्रदर्शनाला त्यांनी भेट दिल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights