युवा महोत्सवात दुस-या दिवशीही विद्यार्थी कलावंतांची दमदार एन्ट्री, विविध कलाप्रकार सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे युवा महोत्सव सुरू आहे. चार दिवस हा युवा महोत्सव चालणार असून युवा महोत्सवाच्या दुस-या दिवशीही विद्याथ्र्यांनी विविध कला प्रकार सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली. शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, भारतीय समूहगान, सुगम संगीत, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग, फोक ऑर्केस्ट्रा या कलाप्रकारात विद्यार्थी कलावंतांनी आपली कला सादर केली.

पहिल्या दिवशी विद्याथ्र्यांंनी लोकनृत्य,भारतीय समूहगान, एकांकिका, स्किट व माईम, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,कोलाज,स्थळ छायाचित्रीकरण, पाश्चिमात्य वाद्यसंगीत/ पाश्चिमात्य एकल गायन व पाश्चिमात्य समूहगान, क्विज लेखी परीक्षा असे कलाप्रकार सादर करुन उपस्थितांची दाद मिळविली.                कलावंत विद्याथ्र्यांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. विजय काळे, युवा महोत्सव समन्वयक प्रा. राज देशमुख, डॉ. निक्कू खालसा यांचेसह महाविद्यालयातील शिक्षकगण महोत्सवासाठी परिश्रम घेत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवासी लाईनमन द्या अन्यथा आंदोलन करू ; ग्राम पंचायत सदस्याचे कार्यकारी अभियंतांना आवाहन 

Thu Oct 12 , 2023
– मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला केराची टोपली ; गोंडेगाव उपकेंद्र अंतर्गत कारभार कारभार कन्हान :- महावितरण विभागाच्या गोंडेगाव उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या टेकाडी गावात गेल्या काही महिन्यांपासून विजेच्या समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त आहेत,विभागाला वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेत नसल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्य सतीश घारड यांच्या नेतृत्वात गावातील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अभियंता भगत यांची भेट घेऊन पाच दिवसात समस्यांचे निराकरण आणि गावात निवासी विद्युत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com