वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी19 वर्षीय मुलीची स्वताच्या वस्तिगृहात गळफांस घेत आत्महत्या

अमरदिप बडगे

गोंदिया – गोंदियायध्ये वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी 19 वर्षीय मुलीने स्वत च्या वस्तिगृहाच्या पंख्याला ओढणीने गळफांस घेत आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना गोंदिया शहरातील मामा चौक येथील आदिवासी मुलीच्या वस्तिगृहात घडली आहे. वर्षा कुवरलाल मसे वय 19 वर्ष असे मृतक मुलीचे नाव आहे. वर्षा ने आत्महत्या का केली याचे कारण सध्या अस्पष्ठ आहे, गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथील रहिवासी असलेली वर्षा 4 वर्षा पासून शिक्षणाकरिता गोंदिया येथील आदिवासी मुलीच्या वस्तिगृहात राहत होती. काल रात्रि वर्षा आपला मैत्रीनी सोबत वाढदिवस सेलिब्रेट करत झोपी गेली. आजची नवीन पहाट वर्षा साठी नवचैतन्य घेऊन येईल अशी आशा बाळगत सकाळी वर्षाच्या मैत्रीनी पेपर देण्यासाठी कॉलेज ला गेल्या. पेपर देऊन परत वस्तिगृहात आल्यावर रूम चा दरवाजा ठोठावला तरी वर्षाने खोलीचा दरवाजा उघड़ला नाही.

अखेर वार्डन च्या सहाय्याने दरवाजा तोडला असता गळफांस घेतलेल्या स्थितीत वर्षा च्या मृतदेह आढळला. लगेच याची माहिती पोलिसांना व वर्षाच्या कुटुंबाला दिली गेली असून घटना स्थळ गाठत कुटुंबाने एकच हंबरडा फोडला आहे. दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरोत्तर तपासणीसाठी शव गोंदिया शासकीय रुग्णालयात पाठविन्यात आला आहे. वर्षा च्या अश्या दुर्देवी मृत्यु ने नवरगावात येथे शोककळा पसरली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सासु-सासऱ्याला ठार करून पत्नी व मुलीला केले जखमी....

Sun Jun 26 , 2022
हिंगणा प्रतिनिधी हिंगणा (ता २६): – पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून नराधम जावयाने दगडाने व कुऱ्हाडीने वार करून सासू व सासऱ्याची हत्या केली तर पत्नी व सावत्र मुलीला जखमी केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास निलडोह ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या अमर नगरात घडली आहे . भगवान बाळकृष्ण रेवारे (वय ६५) सासू पुष्पा भगवान रेवारे( वय ६२),असे मृतकांची नावे आहेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!