– कामगार हा देशाच्या आर्थिक विकासाचा कणा – दिनेश बन्सोड,माजी जि.प.सदस्य
वाडी (प्र):- जागतिक कामगार दिनानिमित्त वाडी स्थित अमरावती महामार्गावरील प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा प्रांगणात इंडेन गॅस सिलेंडर सर्विसेसच्या कामगारांचा एका विशेष कार्यक्रमांतर्गत भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोरगडे यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील ग्रहण करविले.तद्नंतर ज्येष्ठ कामगार बाबुराव वासनिक, राजू भोवते, हिरामण भोवरे, पंडित रंगारी यांचा दुपट्टा,श्रीफळ व पुष्प देऊन माजी जि.प. सदस्य दिनेश बन्सोड यांचे हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी दिनेश बन्सोड यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, उद्योग,व्यापार,इमारत,कृषी इत्यादी क्षेत्र कामगारांच्या योगदाना शिवाय पूर्णत्वास नेणे अशक्य आहे.कामगार हा राष्ट्र निर्माणात आपले जीवन समर्पित करतो म्हणून देशाच्या आर्थिक विकासात कामगारांचे योगदान अमूल्य असल्याचे मनोगत व्यक्त केले.संचालन दिलीप भोरगडे यांनी तर आभार जितेंद्र सोनुले यांनी मानले.कार्यक्रमाला एकनाथ मडके,जितेंद्र सोनुले, अरुण पाटील,दिलीप मोरे,गजानन वासनिक,उत्तम लांजेवार, महेंद्र गाडगे, प्रफुल चौरे,जयपाल कळंबे,कुंदन लांजेवार,भूषण मेश्राम,नरेंद्र गणवीर,रणजीत धांडे,यशवंत मेश्राम, सुरेश जोगदंड,विनोद मेश्राम,मोरेश्वर दुधकवळे, लोकेश नितनवरे, प्रदीप जनबंधू, सुजित मेश्राम,नितीन वाघमोडे इत्यादी उपस्थित होते.