नवी मुंबई :- महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने, दि 12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद जंयती निमित्त दि. बा.पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) बेलापूर जि. ठाणे येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,बेलापूर यांनी दिली.
युवकांच्या विविध गुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी दि. बा.पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर जि. ठाणे येथे दिनांक 09 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीत संस्थेमध्ये कॅरम, बुध्दीबळ, चित्रकला व निबंध अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 जानेवारी 2025 रोजी श्री. आदित्य कारखानिस सहाय्यक निर्देशक, श्रम मंत्रालय, मुंबई भारत सरकार यांचे मार्फत अनुसुचित जाती/ अनुसुचित जमातीच्या वर्ष १८ वयोगटातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक दिवसीय उद्योजकता जागृकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी डॉ. स्नेहल म्हात्रे, तेजज्ञान फाऊंडेशन पुणे, ध्यान ज्ञान केंद्र पनवेल यांचे स्वामी विवेकानंद व त्यांचे विचार यावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच या स्पर्धांमध्ये विजय प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहे.या स्पर्धांमध्ये जास्तीत प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन दि. बा.पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर जि. ठाणेचे प्राचार्य स.ज.पाटील एका प्रसिध्द पत्रकाद्वारे केले आहे.