महाराष्ट्र दिनानिमित्त नागपूर विभागात सकाळी ८.०० वाजता सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय स्थळी ध्वजारोहण

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण

नागपूर :- महाराष्ट्र राज्याचा ६५वा स्थापना दिन आज १ मे २०२४ रोजी राज्यभर साजरा होत असून नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालय स्थळी सकाळी ८.०० वाजता पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. नागपुरचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क येथे होणार आहे.

भंडारा येथील पोलीस कवायत मैदानावर आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते तर गोंदिया येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

चंद्रपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते तर वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रा. डॉ प्रशांत विघे यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर !

Tue Apr 30 , 2024
दापोरी :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार-२०२४ नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये शिक्षक प्रवर्गातून भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा सिनेट सदस्य डॉ प्रशांत विघे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे हजारो विद्यार्थी, मित्र मंडळ व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २०२४ चा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com