तुमसर तालुक्यातील धनेगाव सोनेगाव परिसरात झाली ढगफुटी..

अमरदिप बडगे , प्रतिनिधी 

भंडारा –  जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील जंगल परिसरातील धनेगाव ,सोनेगावात अचानक रात्री दरम्यान ढगफुटी झाल्याने ही गावाना जणुकाय नदिचे स्वरूप आले असून गाव जलमय झाली आहेत.

विजेच्या कडकडाट सह झालेल्या जोरदार पावसामुळे काल रात्री 12 ते 3 दरम्यान ढगफुटी झाल्याने सतत तीन तास पाऊस पडल्याने जंगल परिसरातील धनेगाव व सोनेगाव ही गावे जलमय झाली असून विजेचा कडकडामुळे विज पुरवठा देखील खंडीत झाला आहे .

गावातील काही घरे जमीनदोस्त झाली आहेत.अचानक गावात एवढा पाऊस आल्याने नागरिकांची मात्र तारांबळ उडाली घरात पाऊसाचे पाणी शिरल्याने घरातील सामानाची विल्हेवाट लावण्याकरिता नागरीकांची धावपळ उडाली आहे.अजुनही गावात पाणी दिसुन येत असुन प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!