नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे यशोधरानगर हदीत आरोपींचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीतुन हद्दपार असलेला आरोपी परशुराम मखुंनी गौतम हा विनापवरवाना फिरत आहे, अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून ऑटोमोटीवा चौक येथे गेले असता, तेथे पोलीसांना पाहुन एक ईसम पळुन जातांना दिसुन आला, त्यास घेराव टाकुन ताब्यात घेवुन, त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव परशुराम मखुंजी गौतम, वय ३३ वर्षे रा. शिवनगर, कांद्री, कन्हान, जि. नागपूर असे सांगीतले. आरोपीचा अभिलेख तपासला असता, पोलीस ठाणे यशोधरानगर येथुन मा. पोलीस उप आयुक्त परि. क. ५ यांचे आदेश क. ४/२०२३ नुसार दिनांक ०३.०४.२०२४ रोजी पासून ०६ महिन्या करीता नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हद्दीतून हद्दपार केल्याचे दिसून आले. आरोपी हा विनापरवाना शहर हद्दीत मिळून आल्याने, त्याने हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी फिर्यादी नापोअं. प्रमोद बावणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे आरोपीविरूध्द कलम १४२ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे.
वरील कामगिरी राहुल माकणीकर पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. राहुल शिरे व त्यांचे पथकाने केली.