संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-चंद्रशेखर बावनकुळे, ऍड सुलेखा कुंभारे,राजू पारवे इत्यादींची प्रमुख उपस्थिती
-ड्रॅगन पॅलेस व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आकर्षक विद्दूत रोषणाईने सज्ज
कामठी :- भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त ड्रॅगन पॅलेस कॅम्पस येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर समस्कृतीक व संशोधन केंद्र येथे उद्या 14 एप्रिल ला सकाळी 8 वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री व भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथील राजश्री थाटात बसलेल्या परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात येईल.
याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील धम्मसेवक ,धम्मसेविका, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र,ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था,हरदास विद्यालय,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी,दादासाहेब कुंभारे प्रशिक्षण केंद्र येथील धम्मसेवक-धम्मसेविका,संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व शिक्षकवृंद कर्मचारी तसेच भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील.
परमपूज्य डॉ बाबासाहेब यांच्या जयंती निमित्त दादासाहेब कुंभारे परिसरात असलेले विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र व ड्रॅगन पॅलेस विपस्यना मेडिटेशन सेंटर आकर्षक रोषणाईने सज्ज करण्यात आले आहे आहेत तसेच निळ्या व पंचशील झेंड्यानी सजावट करण्यात आले आहे त्यामुळे संपूर्ण परिसर भीममय झाला आहे.
– कामठी शहरात भव्य रॅलीचे आयोजन
– परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल ला सायंकाळी सात वाजता प्रबुद्ध नगर नया गोदाम येथील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्याला माल्यार्पण करून भव्य रॅलीचा शुभारंभ होणार आहे.कामठी येथील प्रमुख मार्गाने भ्रमण करून या भव्य रॅलीचा समारोप जयस्तंभ चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.
परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त वस्ती वस्तीत जय्यत तयारी सुरू आहे.पंचशील व निळ्या झेंड्यानी शहर सुशोभित करण्यात आले आहे. ठिकठिकाणी थंड पेय,मिठाई,वितरित करण्याकरिता अनेक संस्था पुढे आल्या आहेत.