बुद्ध जयंती निमित्त वाडीत अनुयायाचे अभिवादन

– बुद्धम् शरणम् गच्छामिने परिसर दुमदुमला

वाडी :- प्रज्ञा शील करुणेचे जनक व जगाला शांती,समता व मानवतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त वाडी स्थित अमरावती महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुद्ध पुतळा प्रांगणात अनुयायांनी अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक स्तंभाला माल्यार्पण करून अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली.

तद्नंतर राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे यांचे हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दिलीप भोरगडे यांनी बुद्ध वंदना घेतली.

कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,माजी नगरसेवक प्रमोद भोवरे, दिनेश कोचे,माजी उपसरपंच दत्ताजी वानखेडे, दिलीप मेंढे, भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष रोशन सोमकुवर सह गौतम तिरपुडे, भीमराव कांबळे,राजेश जंगले, पंडित  भोरगडे, बाबुराव वासनिक, प्रवीण तायडे, भोजराज नंदागवळी, देवानंद राऊत, अनिल वानखेडे सह मोठ्या प्रमाणात उपासक-उपासिका उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमी मजबूत करण्यासाठी संघठीत होण्याची गरज - भदन्त सुरेई ससाई यांचे प्रतिपादन

Sat May 6 , 2023
– दीक्षाभूमीवर चार दिवसीय बुद्ध महोत्सव नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हा पासून नागपुरची दीक्षाभूमी जगाच्या नकाशावर झळकत आहे. बौध्द बांधवांची ही प्रेरणा भूमी अधिक मजबूत करण्यासाठी संघठीत होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेनानायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com