15 व 16 फेब्रुवारीला विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नगरपरिषद कामठी मध्ये दिनांक १५ व १६ फेब्रुवारी२०२४ रोजी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केंद्र शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवन्याकारिता विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचे शासनातर्फे आयोजन करण्यात आलेले आहे. ही यात्रा दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ वार गुरुवार दुपारी ३ वाजता सीरिया मैदान कामठी व दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता प्रभाग क्र 14 येथील कळमना रोड वरील डॉ बाबासाहेब मैदान कामठी व दुपारी ३ ला ड्रॅगन पॅलेस कामठी येथे आयोजित करण्यात येईल. सदर मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजना ,प्रधानमंत्री आवास योजना,आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना,बैंकमार्फ़त विविध कर्ज योजना, आधार अपडेट,आरोग्य शिबीर,इ विविध योजनाची माहिती व लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.

तरी नागरिकांना सदर संकल्प यात्रेत सहभागी होवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन कामठी नगर परिषद चे मुख्यअधिकारी व प्रशासक संदीप बोरकर यांनी नागरिकांना केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दोन एम डी तस्करबाजास अटक करण्यात डीसीपी पाच पथकाला यशप्राप्त..

Thu Feb 15 , 2024
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 15:-नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 हद्दीत येणाऱ्या पिवळी नदी बस स्टॉप जवळ अवैधरित्या एम डी बाळगणाऱ्या दोन एम डी तस्करबाजास अटक करण्यात डी सी पी पाच पथकाला काल सायंकाळी साडे सात दरम्यान यशप्राप्त झाले असून या धाडीतून 3.50ग्राम मेफेड्रोन ड्रग्स , दोन महागडे मोबाईल,एक दुचाकी असा एकूण 1 लक्ष 2 हजार 300 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com