संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण, भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कामकाज करण्याचे निर्देश
कामठी :- लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रियेला अतिशय महत्वाचे स्थान असून ही निवडणूक प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पाडण्याची जवाबदारी प्रत्येकाची आहे.यामध्ये मतदान केंद्रावर नियुक्त केंद्राध्यक्ष ,मतदान अधिकारी यांची भूमिका महत्वाची असून सर्वांनी पारदर्शक ,निष्पक्षपाती कामकाज करावे अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी कामठी येथील डीपीएस सभागृहात आयोजित रामटेक लोकसभा मतदार संघ अंतर्गत कामठी विधानसभा क्षेत्रातील अधिकारी,कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण कार्यक्रमात दिल्या.याप्रसंगी कामठी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मौदा उपविभागोय अधिकारी सचिन गोसावी, तहसिलदार गणेश जगदाडे, नोडल अधिकारी संदीप बोरकर आदी उपस्थित होते.
येत्या 19 एप्रिल ला होऊ घातलेल्या रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पाश्वरभूमीवर कामठी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र अधिकारी,सहाय्यक मतदान केंद्र अधिकारी ,इतर मतदान अधिकारी यांच्या मतदान विषयक प्रथम प्रशिक्षणाचे आयोजन काल 8 एप्रिल ला दिल्ली पब्लिक स्कुल च्या सभागृहात सकाळी 10 ते दुपारी दीड व दुपारी 2 ते सायंकाळी साडे पाच पर्यंतच्या दोन टप्प्यात
पार पडले तर दुसरे प्रशिक्षण उद्या 10 एप्रिल ला होणार आहे.या प्रशिक्षण क्षेत्रात कामठी विधानसभा मतदार संघातील 508 मतदान केंद्रातील एकूण 1260 कर्मचारी सहभागी झाले होते.