महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सेवा,साहास व स्वाभिमान या उद्देशातून कार्य करावे – ॲड. नंदा पराते

नागपूर :- शहर महिला काँग्रेसच्या नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम देवडिया काँग्रेस भवन येथे महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नागपुर शहर (जिल्हा )महिला काँग्रेस कमेटी अध्यक्ष ॲड. नंदा पराते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेस महासचिव गिरीश पांडव, अतूल कोटेचा, ओबीसी महिला अध्यक्ष वृदा ठाकरे, काँग्रेसचे वरीष्ठ कार्यकर्ते अनिल आदमने , प्रदेश महिला काँग्रेसचे महासचिव नफिसा अहमद, वर्षा गुजर ,आशा राऊत,सुरेखा जिचकार, राधा  पाठराबे, छाया निमसरकार ह्या मंचावर उपस्थित होते, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शहर महिला काँग्रेस कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

       या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करतांना प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस व नागपूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष ॲड. नंदा पराते म्हणाल्या की महिलांनी देशाच्या संविधान रक्षणासाठी समाजात जागृती करण्याची गरज आहे. संविधानातून महिलांना न्याय, हक्क व अधिकार मिळालेत मात्र संविधान विरोधी वृत्ती गुलाम करण्यासाठी प्रयत्न करतील, ते हाणून पाडण्यासाठी देशात संविधान निर्माण करणारा काँग्रेस पक्षासोबत आम्ही एकजूटीने उभे राहून संघर्ष केला पाहीजे.

ॲड. नंदा पराते पुढे म्हणाल्या की महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजासाठी सेवा करण्याच्या माध्यमातून समाजाला पुढे नेण्याचे कार्य साहासाने केले पाहीजे. भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना स्वाभिमान मिळवून दिले आहे म्हणून महिला काँग्रेसच्या कार्यकत्यांनी सेवा, साहास व स्वाभिमान या ध्येयानुसार सामाजिक व राजकीय कार्य सुरु करावे.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश काँग्रेस महासचिव गिरीश पांडव, अतूल कोटेचा, ओबीसी महिला अध्यक्ष वृदा ठाकरे, वरीष्ठ कार्यकर्ते अनिल आदमने , प्रदेश महिला काँग्रेसचे महासचिव नफिसा अहमद, वर्षा गुजर ,आशा राऊत,सुरेखा जिचकार, राधाबाई पाठराबे, छाया निमसरकार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसने संविधानाप्रमाणे महिलांना न्याय दिले म्हणून महिला पदाधिकाऱ्यांनी महिला काँग्रेसच्या ध्येयानुसार कार्य करून समाजात जागृती करावी आणि महागाई , बेरोजगारी व अन्यायाविरोधात संघर्ष करावे असे आवाहन महिलांना करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन महिला कॅाग्रेसच्या प्रदेश नेत्या उषा कुमरे व आभार प्रदर्शन अनिता हेडाऊ यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना जाहीर करून एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दशकात भारत संपन्न झाला या दाव्याची सत्यता जगासमोर आणली 

Fri Jul 5 , 2024
नागपुर :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना आणल्याबद्दल आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो कारण महायुती सरकारने मध्यप्रदेश सरकार पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दशकात भारत संपन्न झाला या दाव्याची सत्यता जगासमोर आणली आहे ,एकीकडे जो सर्वांना पोसणारा अन्नदाता याला फक्त ५०० रुपये सन्मान निधी दिल्यांनतर लाडकी बहीण योजना जाहीर करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com