विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथ

नागपूर :- राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.       विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमास उपायुक्त राजलक्ष्मी शहा, आशा पठाण, चंद्रभान पराते, तहसीलदार राजेश भांडारकर, डॉ. हंसा मोहने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Mon Oct 31 , 2022
ठाणे :- राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. फिफाच्या १७ वर्षाखालील महिला वर्ड कप स्पर्धेच्याच्या निमित्ताने आयोजित फुटबॉल फॉर स्कुल उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, फिफाचे अध्यक्ष जीयानी इंफॅन्टिनो, भारतीय फुटबॉल फेडरेशनचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com