आता नेत्यांचं ऐक्य नको रिपब्लिकन जनतेचे ऐक्य पाहिजे – नारायण बागडे

चंद्रपूर :- रिपब्लिकन नेत्यांचे ऐक्य हे हास्य झाले एक होता होता कित्येक नेत्यांच्या हार आणि गोवऱ्या घाटावर पोहोचल्या आहेत तरी पण सत्तेच्या व पदाच्या मोह गेला नाही बाप अध्यक्ष बायको उपाध्यक्ष पोरगं कोषाध्यक्ष या मध्ये सोन्या जशा रिपब्लिकन पक्षाला परिवारात गुंफून पक्षांचे तिन तेरा केले सुर्य चंद्र याला लागलेले ग्रहण तरी वर्षातून एकदा सुटते पंरतू रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफूटीचे ग्रहण अजून पंर्यत सुटत नाही मग आता एकच पर्याय आता रिपब्लिकन नेत्यांच्या ऐक्याचा भानगडीत न पडता रिपब्लिकन जनतेचे ऐक्य करूया हा संदेश देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने धन्य झालेलं दिक्षा भुमी येथे अनुप्रर्वतक दिनानिमित्त आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आणि समता सैनिक दलाच्या वतीने चंद्रपूर शहरांची परिक्रमा करित रिपब्लिकन जन एक व्हो संदेश मार्च काढण्यात आला होता या प्रसंगी आंविमो आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे प्रांजळ कबुली दिली मार्चचे नेतूत्व चंद्र पूर जिल्हा अध्यक्ष नागसेन खंडारे,जिवन निमगडे, बौद्ध धर्मा बागडे प्रविण आवळे, इंजिनिअर अनिल मालके, भाऊराव बोरकर यांनी केले.

नागसेन खंडारे पुढे म्हणाले आम्ही सर्व काही सहन करू शकतो रिपब्लिकन शब्द आम्हाला आमच्या शरीरातील जसे अंग आहे तसेच आमच्या जिवनाचा एक भागच आहे याला आमच्या पासुन दुर करू शकत नाही या शब्दांची गरिमा आणि पवित्रा कायम ठेवण्यासाठी दोन नाही चार दंडे मारायची वेळ आली तरी धम्म योद्धा आणि समता सैनिक दल मागे पुढे पाहणार नाही त्यांचे प्रात्यक्षिक आज करून दाखवले आहे रिपब्लिकन जन एक व्हो संदेश घोषणा देऊन बौद्ध धर्मा बागडे यांनी परिसर दणाणून सोडले याला मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनतेने प्रतिसाद दिला असे चंद्रपूर शहर अध्यक्ष जिवन निमगडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मोबाईल ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रम - विजयलक्ष्मी बिदरी

Wed Oct 18 , 2023
Ø आकांशा प्रकल्पांतर्गत 50 हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण Ø रोटरी आणि प्रशासनाचा संयुक्त उपक्रम नागपूर :- ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्यभूत ठरणारा ‘आकांशा’ या ‘शिक्षण आपल्या दारी’ प्रकल्पांतर्गत विभागातील सर्व शासकीय शाळांमध्ये अँड्रॉईड मोबाईल ॲपच्या माध्यमातून 10 वीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषय सुलभपणे मोफत शिकता येणार आहे. हा प्रकल्प 50 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी रोटरी क्लबची मदत होणार असल्याची माहिती, विभागीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com