कुख्यात गुंड स्थानबध्द

नागपुर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ११.०४.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर चे ह‌द्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे निखील उर्फ निक्कु सुरज यादव, वय २० वर्ष रा. अवै नगर, चिंचेच्या झाडाजवळ, पोलीस ठाणे, पारडी, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक ११.०४.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दिनांक ११.०४.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

निखील उर्फ निक्कु सुरज यादव, याचेविरूध्द पोलीस ठाणे पारडी येथे खुन करण्याचा प्रयत्न करणे, इतरांचे जीवीतास धोक्यात आणणारी कृती करणे, जबरी चोरी करतांना आपखुशीने दुखापत करणे, प्राणघातक शस्वाने आपखुशीने दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, अश्लिल शिवीगाळ करणे, शांतता भंग करण्याच्या उदद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, आपराधीक धमकी देणे, प्राणघातक शख जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्तेविरुध्दचे तसेच शरीराविरूध्दने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबध्द इसमाविरूध्द पारडी पोलीसांकडून सन २०२३ मध्ये कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्याचेकडून रू. ३०,०००/- रक्कमेचे ०२ वर्षाकरिता चांगली वर्तणुक ठेवण्याबाबत अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले. परंतु सदर इसमाने सदर बंधपत्राचे उल्लंघन करून अलीकडील काळात पोलीस ठाणे पारडी हद्दीत खुन करण्याचा प्रयत्न करणे, इतरांचे जीवीतास धोक्यात आणणारी कृती करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, शांतता भंग करण्याच्या उददेशाने जाणीवपूर्वक अपमान करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे निखील उर्फ निक्कु सुरज यादव, याची अपराधीक कृत्ये असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता, गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव तयार केला, त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेवा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत, त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निर्दयतेने व क्रूरपणे कत्तल करण्याकरीता वाहतुक करीत असलेल्या २४ गोवंशीय जनावरांची सुटका, तिन आरोपी ताब्यात, एकुण २३,६०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त

Fri Apr 12 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे पारडी चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, पाळत ठेवुन, पो. ठाणे हद्दीत नागपूर भंडारा, हायवे रोडवर, हल्दीराम कंपनी जवळ आम रोडवर सार्वजनीक ठिकाणी, एका संशयीत आयसर ट्रक क. एम. पी ९ जी.एच ४८३५ यास धांववुन रेड कारवाई केली असता, त्यामध्ये एकुण २४ जिवंत गोवंशीय जनावरे यांना कोंबुन, त्यांना कुरतेने व निर्दयतेने वागणुक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!