कुख्यात गुंड स्थानबध्द

नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ३०.०४.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे जरीपटका, कोतवाली, मानकापुर सदर व लकडगंज नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे भगीरथ उर्फ भागराज वल्द जंगलु गेडाम, वय २४ वर्षे, रा. गोंडवाना चौक, वैरामजी टाउन, खदान झोपडपटट्टी, आदीवासी नगर, पोलीस ठाणे सदर, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृयांना आळा घालणे संबंधी अधिनियम १९८१ अंतर्गत दिनांक ३०.०४, २०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. ३०,०४,२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

भगीरथ उर्फ भागराज वल्द जंगलु गेडाम, याने विरूध्द पोलीस ठाणे जरीपटका, कोतवाली, मानकापुर सदर व लकडगंज नागपूर शहर येथे खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक शस्त्राने आपखुशीने गंभीर दुखापत करणे, प्राणघातक शस्त्राने आपखुशीने दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, दुखापत करण्याची पुर्व तयारी करून नंतर गृह-अतिक्रमण करणे, मालमत्ता असलेले पात्र अप्रामाणिकपणे फोडणे, दिवसाची व रात्रीची घरफोडी करणे, चोरी करणे, शांतता भंग करण्याचे उददेशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, आपराधीक जीवे मारण्याची धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्राणघातक शख जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरूध्दये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर प्रस्तावित स्थानबध्द इसमावर चांगल्या वर्तणुकीसाठी पोलीस ठाणे सदर अंतर्गत २०२१ व २०२२ मध्ये कलम ११०(ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती. परंतु प्रस्तावित स्थानबध्द इसमावर केलेल्या प्रतिबंध कारवाईचा कोणताही परिणाम झाला नाही. त्याने अलीकडील काळात पोलीस ठाणे लकडगंज व सदर हदद्दीत प्राणघातक शस्त्राने आपखुशीने दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, शांतता भंग करण्याचे उदद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, प्राणघातक शस्य जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लयंन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे भगीरथ उर्फ भागराज वल्द जंगलु गेडाम, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे सदर, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्यये स्थानबध्द प्राधिकारी मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थान वध्द इसमाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह, हर्मुल येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत, त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

६५ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस: राज्यपालांचे राजभवन येथे ध्वजारोहण

Wed May 1 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले. राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते. Follow us on Social Media […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!