कुख्यात गुंड स्थानबद

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार  यांनी दिनांक २६/०५/२०२३ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पाचपावली, यशोधरानगर, राणाप्रताप नगर आणि सदर नागपूर चे हद्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे अभय वल्द अजय हजारे, वय २४ वर्ष रा. बाळाभाऊपेठ, पुकुटीनगर, शिवकृपा हॉलसमोर, पो.ठाणे पाचपावली, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडपट्दादा हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुचा काडा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम सन् १९८१ अंतर्गत दिनांक २६/०५/२०२३ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. २९/०५/२०२३ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

अभय वल्द अजय हजारे, याचे विरुद्ध पोलीस ठाणे पांचपावली, यशोधरानगर, राणाप्रतापनगर आणि सदर येथे खून करणे, खूनाचा प्रयत्न करणे, अपराध्याला वाचविण्यासाठी गुन्हयाचा पुरावा नष्ट करणे, दरोडा घालण्याची पूर्व तयारी करणे, दरोडा टाकणे करीता एकत्र जमणे, मारपीट करणे, आपखुशीने घातक शस्त्राने किंवा साहित्याने दुखापत करणे, घातक हत्यारांनी व साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचविणे, अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, फौजदारीपात्र कट रचणे, बेकायदेशीर जमाव तयार करणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होणे, दंगा करणे. प्राणघातक हत्यारांसह सज्ज होऊन दंगा करणे, अग्नीशस्य जवळ बाळगणे, घातक हत्यार जवळ बाळगणे, अमली पदार्थ जवळ बाळगणे, दरोडा घालण्याकरिता एकत्र जमणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी मालमत्ता आणि शरीराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबध्द इसमास गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि चांगल्या वर्तणुकांसाठी पो. ठाणे पाचपावली अंतर्गत सन २०१८ २०१९ २०२१ २०२२ मध्ये कलम १९०७) (ग) सीआरपीसी, अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर सुध्दा त्याचेमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. याउलट त्याने नवीन जोमाने सतत गुन्हे करणे सुरु ठेवल्याने त्यास एम. पी.डी.ए. कायदया अंतर्गत दिनांक २९/०९/२०२१ रोजी स्थानबध्द करण्यात आले होते. स्थानबध्दतेचा एक वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यास स्थानबध्दतेतून मुक्त करण्यात आले. त्यानंतर सुध्दा त्याने आपली गुन्हेगारी प्रवृत्ती सुरूच ठेवली व त्याने पोलीस ठाणे पाचपावली व सदर होत अग्निशस्त्र जवळ बाळगणे, घातक हत्यार जवळ बाळगणे, अमली पदार्थ जवळ बाळगणे, दरोडा घालण्याची पूर्व तयारी करणे, दरोडा घालण्याकरिता एकत्र जमणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी अशा स्वरूपाचे गुन्हे केल्याने त्यास पुन्हा एम. पी. डी. ए. कायदया अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे अभय वल्द अजय हजारे, याची अपराधीक कृत्ये निरंतर वाढत असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस चाचा निर्माण होत असल्याने गोरख भामरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ३ यांचे मार्गदर्शनाखाली व.पो. नि. वैभव जाधव, पोलीस ठाणे पाचपावली, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला असता अवती दोर्जे, सह पोलीस आयुक्त संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) व मुम्मका सुदर्शन व अर्चित चांडक पोलीस उप आयुक्त, गुन्हे प्रकटीकरण शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेतील एम. पी. डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थान प्राधिकारी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद गुंडाविरूध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी वर नमुद्र इसमाविरूध्द स्थानबध्दतेची महत्वपूर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस अटक

Tue May 30 , 2023
नागपूर :- दिनांक २६.०५.२०२३ चे २२.०० वा. ते दिनांक २८.०५.२०२३ चे ०४.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत राहणारी २४ वर्षीय फिर्यादी यांचा परिचीत आरोपी नामे संजय रामचंद्र डोंगरे वय ३५ वर्ष रा. भिवसनखोरी, गिट्टीखदान याने फिर्यादी ही घरी हजर असतांना आरोपी हा दारू पिऊन फिर्यादीचे घरी आला फिर्यादीस “तु मला खुप आवडते असे बोलून फिर्यादी सोबत तिचे ईच्छेविरुध्द […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com