बेकायदेशीर घेतलेल्या पथदिव्यांपैकी एकही पथदीप गावात लावलेला नाही

–  ग्रामपंचायत चे अधिकृत पथदिव्यांच्या पुरवठा करणारे निविदाधारक सुरेश निमकर 

कोदामेंढी :- शासनाच्या ई पोर्टल वरील माहिती नुसार येथे 20/05/2024 रोजी नागपूर येथील एम .एम. इंटरप्राईजेस मधून पथदिवे खरेदी करण्यासाठी तीन लाख 88 हजार 474 रुपये काढण्यात आले मात्र त्याची प्रोसिडिंगवर नोंद 70 हजार करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू बावनकुळे भ्रमणध्वनी वरून सांगितले.

दिनांक 07/10/2024 सोमवारला येथील गोविंद पेट्रोल पंपाजवळ सदर वार्ताहर पेट्रोल भरीत असताना येथील ग्रामपंचायतचे अधिकृत पथदिव्यांच्या पुरवठा करणारे निविदाधारक श्रीकृष्ण इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअर चे प्रॉपरेटर सुरेश निमकर यांना विचारपूस केली असता गावात लावलेले पथदिवे हे आजपर्यंत माझ्याकडून घेतलेल आहे व आताही ग्रामपंचायत कडून घेणं सुरूच आहे .नागपूर येथील एम .एम. इंटरप्राईजेस दुकानातून घेतलेले पथदिवे गावात लावलेले नसल्याचे त्यांनी सांगितले, व ही खरेदी बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

बेकायदेशीर घेतलेले पथदिवे गावातील पोलमध्ये लावण्यात आलेलं नाही तर ते कुठे लावण्यात आले? गावात मुक्कामी न राहणारे सरपंच आशिष बावनकुळे यांनी पथदिवे खरेदी प्रकरणात बेकायदेशीरपणे ग्रामपंचायत मध्ये अनियमित्ता तर केली नाही ना ?अशी शंका गावकऱ्यांना येत असून याबाबत येत्या 9 तारखेच्या मासिक सभेत कळणार असून मासिक सभेकडे समस्त ग्रामवासियांचे लक्ष वेधलेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्थानकावर दोघांची हत्या, दोघे गंभीर जखमी

Tue Oct 8 , 2024
– रेल्वेच्या लाकडी स्लीपरने डोक्यावर प्रहार, पहाटे सव्वा तीन वाजताची घटना, घटनेपूर्वी एका प्रवाशाला केली मारहाण, लोहमार्ग पोलिसांची पेट्रोलिंग नाही नागपूर :- एका माथेफिरूने इसमाने पन्नास किलो वजनी रेल्वेच्या लाकडी स्लीपरने झोपेतील प्रवाशांचे डोके ठेचून रक्तबंबाळ केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही जखमींना मेयो रूग्णालयात नेले असता दोघांचा मृत्यू झाला. ही थरार घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com