कळमेश्वर :- पो.स्टे. कळमेश्वर अंतर्गत १० किमी अंतरावर मौजा पुर्ती कंपनी धापेवाडा भडांगी रोडचे बाजुला कच्चा रस्त्याला पांदन रोड जवळ दिनांक १५/०४/२०२३ चे १८/३० वा. ते १६/०४/२०२३ चे ०८/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- संजय रूपराव ठाकरे, वय २७ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ वेल्लोरी ता. कळमेश्वर जिल्हा नागपूर याचा मोठा भाऊ मृतक नामे- विजय रूपराव ठाकरे, वय ४० वर्ष, ग वार्ड क्र. ३ बेल्लोरी ता. कळमेश्वर याला यातील संशयित आरोपी नामे- १) शरद सुर्यभान ठाकरे, वय २८ वर्ष रा. पोस्ट वल्मी गाव बेल्लोरी ता. कळमेश्वर २) रुपाल सेवकदास पाटिल, वय ३५ वर्ष पोस्ट वल्मी गाव बेल्लोरी त. कळमेश्वर ३) केशव दिलीप भोयर, वय २८ वर्ष रा. पोस्ट वल्मी गाव बेल्लोरी ता. कळमेश्वर ४) महिला मेघा विजय ठाकरे, वय ३३ वर्ष, रा. पोस्ट वल्मी गाव बेल्लोरी त. कळमेश्वर यांनी फिर्यादीचे वहिनी मेघा हिले सोबत असलेले अनैतिक प्रेम संबंधातुन फिर्यादीच्या मोठा भावाचा गळा आवरून खुन केल्याचा संशय आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे आरोपीविरुद्ध कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि शरद गायकवाड पो.स्टे. कळमेश्वर हे करीत आहे.
@ फाईल फोटो