सुरगाव येथे ‘ कत्तलखाना नको ‘ – राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट)यांचे निवेदन

बेला :- नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचे वतीने प्रस्तावित करण्यात आलेल्या उमरेड तालुक्यातील सुरगाव येथील कत्तलखान्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने विरोध केला असून त्याबाबत उमरेडचे तहसीलदार मनोहर चव्हाण यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. नियोजित कत्तलखाना रद्द झाला नाही. तर त्या विरोधात जन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमरेड विधानसभा क्षेत्र निरीक्षक दिनेश साळवे यांनी दिला आहे. यावेळी युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव शुभम केदार, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र वैद्यकीय मदत कक्ष नागपूर विभागीय अध्यक्ष संदीप मोटघरे आणि हर्षल उगले प्रामुख्याने उपस्थित होते.

मौजा सुरगांव येथील खसरा नं. 293 क्षेत्र 16.28 हेक्टर आर जागेपैकी विद्यमान नागपूर कुही मुख्य रस्त्यालगतची 1 हेक्टर जागा कत्तलखाना विकसित करण्यासाठी हस्तांतरित करण्याबाबतचा जाहीरनामा गेल्या 7 जूनला उमरेडचे तहसीलदारांनी प्रसिद्ध केला असून त्यासाठी आक्षेप हरकती मागवण्यात आल्या आहेत. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यासंदर्भात 15 जूनला e.निविदा सूचना सुद्धा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली आहे.

ग्रामस्थांचाही आहे विरोध

सुरगांव व आसपासचे उंदरी, खापरी (राजा) आनंदवन, डोंगरगाव, मांगली,चंपा, वडगाव (काळे),लांजाडा, दीपाळा, डोडमा, खापरी सोनेगाव खदानपरिक्षेत्रातील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक ग्रामस्थांनीही कत्तलखान्यात विरोध केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जनहित लक्षात घेऊन सदर प्रस्तावित कत्तलखान्यास विरोध दर्शवला असून प्रसंगी कत्तलखान्याचे विरोधात आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे विधानसभा क्षेत्र निरीक्षक दिनेश साळवे यांनी व्यक्त केला.त्यांना उमरेड तालुका ग्रामीण चे अध्यक्ष उत्तम पराते यांनी पाठिंबा दिला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समाजातील सर्व घटकांनी योग दिन कार्यक्रमात सहभागी व्हावे - अजय चारठाणकर

Thu Jun 20 , 2024
– सामूहिक योगासन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा  नागपूर :- जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे जनतेला आवाहन करीत अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी प्रशासनाने समाजातील सर्व घटक सहभागी व्हावेत यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग्य दिनाचा कार्यक्रम शुक्रवार २१ जून रोजी धंतोली स्थित यशवंत स्टेडियम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com