नागपूर :- राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना व महाराष्ट्र राज्य वनमजूर, वनकामगार व क्षेत्रीय कर्मचारी संघटना नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अजय पाटील यांचे नेतृत्वात संघटनेच्या शिष्ट मंडळाने वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन वनरक्षक, वनपाल, हंगामी/बारमाही व स्थाई वनमजूर, संगणक चालक, वाहन चालक यांच्या सेवाविषयक विविध अडचणी व समस्यांबाबत निवेदन देऊन चर्चा केली. त्यात प्रामुख्याने, वनपाल एस-१४ (३८६००- १२२८०० ) व वनरक्षक एस-९ (२६४०० – ८३६००) वेतन श्रेणीत वाढ करणे,सर्व वनरक्षक, वनपाल वनमजूर तसेच वाहन चालक यांना कॅश लेश सुविधा लागू करणे, वनरक्षक व वनपाल यांना वनात गस्तीकरिता दुचाकी वाहन पुरवठा करणे, बारमाही व हंगामी वनमजूर, संगणक चालक/ वाहन चालक यांना स्थाई करणे, स्थाई वाहन चालक यांना गणवेश भत्ता लागू करणे, विश्राम कक्ष तयार करणे, वाहन चालक यांना पदोन्नतीनुसार खांद्यावर एक स्टार लावण्यास मंजुरी देणे, या व अशा अनेक मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वन विभागातील सर्व हंगामी वन कामगार, संगणक चालक, वाहन चालक यांना स्थाई करणार यापुढे कुणीही अस्थाई राहणार नाही असे आश्वासन वनमंत्री यांनी संघटनेच्या अध्यक्षांना दिले. तसेच लवकरात लवकर वनरक्षक व वनपाल यांना वनात गस्तीकरिता दुचाकींचा पुरवठा सुद्धा करण्यात येईल अशी हमी सुद्धा संघटनेला दिली. तसेच इतर सर्व मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याही मार्गी लावण्यात येईल असे सांगितले. प्रसंगी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष माधव मानमोडे, गडचिरोली वनवृत्त अध्यक्ष सिद्धार्थ मेश्राम, नागपूर वन वृत्त अध्यक्ष आनंद तिडके, तसेच गडचिरोली व नागपूर वन वृत्तातील राजेंद्र कोडापे, रूपेश मेश्राम, विजय घोडवे, गंगाधर मुसळे, समीर नेवारे, ममता भोसले, ललिता वरघट, रेखा राठोड, इत्यादी महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.
वनविभागात कोणतेही पद अस्थाई राहणार नाही – वनमंत्री गणेश नाईक यांचे वनरक्षक-वनपाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय पाटील यांना आश्वासन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com