गडचिरोलीला कोणी थांबवू शकत नाही !…अमर्याद संधीतून आपला विकास करून घ्या, महामॅरेथॉन मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

गडचिरोली :- गडचिरोलीला कोणी घाबरवू शकत नाही आणि थांबवू शकत नाही असा संदेश महामॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी तरूणाईने दिला आहे. गडचिरोलीच्या या तरूणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आपल्याला मिळत असलेल्या अमर्याद संधीतून आपला व समाजाचा विकास करून घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

गडचिरोली महा-मॅराथॉन 2024 – ‘एक धाव आदिवासी विकासासाठी’ या गडचिरोली पोलिस दलाच्या उपक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी जिल्हा परिषद मैदान येथे उपस्थित होते. यावेळी 3 कि.मी., 5 कि.मी., 10 कि.मी. व 21 कि.मी. मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी झेंडी दाखवून मॅराथॉन स्पर्धेला सुरूवात करून दिली.

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, एस रमेश (अहेरी) व प्रतीश देशमुख,(अभियान) तसेच पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

SHAURYA SANDHYA BHARTIYA SENA - PRERNA KA PRATEEK AT NAGPUR FROM 02 FEB 24 TO 04 FEB 24

Mon Feb 5 , 2024
Nagpur :-Headquarters Uttar Maharashtra and Gujarat Sub Area proudly showcased the might and pride of Indian Army for the citizens of Nagpur from 02 to 04 Feb 2024. The event flagged off at a opening ceremony by  Devendra Fadnavis, Hounourable Deputy Chief Minister of Maharashtra and General Manoj Pande, Chief of Army Staff. The exhibition provided an unique opportunity for […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com