नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी २७ मे रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नागपूर महानगरतर्फे पकवासा आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यात आले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रुग्णांना फळ वितरीत करून ना. नितीन गडकरी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी शंकर मेश्राम, अनंत जगनीत, इंद्रजीत वासनिक, हिमांशू पारधी, महेंद्र प्रधान, मोहिनी रामटेके, सचिन जाधव, नितिन वाघमारे, प्रशांत तोमस्कर, अमर लौहकरे, संदीप पाटील, राजेश सोमकुवर, प्रकाश किटे, रमेश पाडन, आकाश सातपुते, अनु हातीपछेल, अभिलाष बक्सरे, दीपक मघाडे, प्रीति बहादुरे, बंटी पैसाडेली, कैलाश खेरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.