संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– बँकेचे अध्यक्ष डॉ. आशिष र. देशमुख यांनी नागरिकांना केले उपस्थित राहण्याचे आवाहन.
कामठी :- ग्राहक सेवेसाठी सुपरिचित असलेल्या अरविंद सहकारी बॅंक लि. च्या कामठी शाखेचा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते रविवार, दि. २७ ऑगस्ट २०२३ ला किराणा ओळी (बॅंक ऑफ इंडिया जवळ), कामठी येथे दुपारी १२.३० वाजता संपन्न होत आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजीतबाबू देशमुख (माजी कृषी मंत्री, म.रा.), प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (माजी मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष), अॅड. सुलेखा कुंभारे (माजी राज्यमंत्री, म.रा.) व टेकचंद सावरकर (आमदार, कामठी-मौदा विधानसभा क्षेत्र) हे उपस्थित राहतील.
विधायक कार्याचे जनक स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या नावाने कार्यरत अरविंद सहकारी बँक लि. च्या काटोल, सावनेर, गांधीबाग नागपूर, डिगडोह नागपूर, वरुड, अमरावती अशा ६ शाखा आहेत. सातवी शाखा कामठी येथे ग्राहक सेवेत रुजू होत आहे. ‘लंच ब्रेक’ न घेता सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.०० पर्यंत आणि रविवारीसुद्धा ग्राहक सेवेचा लाभ कामठी परिसरातील ग्राहकांना घेता येणार आहे. १००० कोटींच्या डिपॉझीटचे उद्दिष्ट बँकेने पूर्ण केले असून या विदर्भातील अग्रगण्य बँकेसाठी उत्कृष्ट ग्राहक-सेवा सर्वोच्च आहे. बँकेच्या आर्थिक प्रगतीचे आणखी एक पाऊल म्हणजे कामठी येथे लोकसेवार्थ नवीन शाखा सुरु करून चांगली सेवा देणे आहे.
अरविंद सहकारी बॅंक लि., कामठी शाखेच्या उद्घाटन समारंभास परिसरातील मान्यवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ. आशिष र. देशमुख यांनी केले आहे.