गावांच्या विकासकामांसाठी एकजुटीने प्रयत्न करा – चरणसिंग ठाकूर
काटोल :-आपण ग्रामपंचायत, सदस्य, सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर आपणाकडून मतदारांच्या विकासात्मक अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला आबाधित ठेवण्याकरीता सर्व सरपंच, सदस्य बंधू भगिनींनी विकासकामाकरीता मतभेद होवू न देता विकासकामांसाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे चंदशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन नागपूर जिल्हा भाजप उपाध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर यांनी केले ते भारतीय जनता पार्टी, काटोल – नरखेड विधानसभाचे वतीने काटोल येथे आयोजित नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
नवनिर्वाचित सरपंच, सदस्य यांनी आपल्या गावाचा विकासात्मक आराखडा तयार करून गाव सुंदर करण्याकरीता प्रस्ताव तयार करावेत व विविध योजनेच्या माध्यमातून गावाकरीता निधी आनण्याचे दृष्टीने पाठपुरावा करण्याकरिताआम्ही आपल्या पाठीशी राहूअसे प्रतिपादन नागपूर जिल्हा भाजपा अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केले.
आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये, प्रमुख अतिथी म्हणून चरणसिंग ठाकूर, उकेश चव्हाण, जिल्हा संघटन मंत्री किशोर रेवतकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी नगराध्यक्षा वैशाली ठाकूर, माजी जि.प. सदस्य अनिल निधान, जि.प. सदस्या काळबांडे, पं.स. सदस्या लता धारपुरे, पं.स. नरखेड उपसभापती स्वप्नील नागापुरे, कृ.ऊ.बा.समिती काटोलचे उपसभापती गंगाधर झळके, कृषीमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश ठाकरे, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे, मनोज कोरडे, शामराव बारई,किशोर गाढवे, सुरेश खसारे, राजू चरडे, संजय कामडे, विजय महाजन, सोपान हजारे, कोमल देशमुख, तानाजी थोटे, दिलीप ठाकरे, गजानन भोयर, रमेश तिजारे, नानाजी माळवी, प्रसन्न श्रीपतवार, कृ.ऊ.बा. समिती काटोलचे संचालक हेमंत जिचकार, डिगांबर धवड,, रुपेश तातोडे, प्रवीण अडकीने, मोहन मुन्ने, नलुबाई भोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. देविदास कठाणे यांनी तर प्रास्ताविक योगेश चाफले यांनी केले. उपस्थितांचे आभार राजू चरडे यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करीता भूषण भोयर, शुभम परमाल, चैतन्य भजन, निहाल कुमेरिया, कुणाल ढगे, यांनी अथक परिश्रम घेतले.