नवनियुक्त  कुलगुरू प्रो. मधुसदन पेन्ना यांनी साधला पत्रकारांशी संवाद…

-मला मिळालेल्या कालखंडात मी माझ्या जवाबदाऱ्या पूर्ण करेल – कुलगुरु प्रो मधुसदन पेंना  
संधीचे सोने करून माझ्यावर विद्यापीठाने टाकलेला विश्वास पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करण्याचा कुलगुरू महोदय यांनी व्यक्त केला विश्वास
रामटेक :- कवी कुलगुरू संस्कृत  विश्व  विद्यालयाच्या प्रभारित कुलगुरू  पदी प्रोफेसर मधुसूदन पेन्ना  यांची नुकतीच नियुक्ती झाली.  त्यांनी कवी कुलगुरू संस्कृत  विश्व  विद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये   विविध वृत्तपत्राचे पत्रकार  व मीडिया न्यूज चॅनल रिपोर्टर यांचेशी  संवाद साधला. यावेळी कुलगुरू महोदय  म्हणाले की “माजी कुलगुरू श्रीनिवास वरखेडी यांनी या विश्वविद्यालयाला  एक व्यापक दृष्टीने  नवी दिशा दिलेली आहे.
त्या अनुषंगाने मी माझ्या जवाबदाऱ्या पूर्ण करेल. रामटेक येथे सामाजिक आणि शैक्षणिक कामाची व्याप वाढवणे , वरंगा येथे महाविद्यालयाला मिळालेल्या ५० एकर जागेत अभिनवभारती परिसराचा  विकास करायचा आहे , महाराष्ट्र शासन यांच्या परवानगीने रत्नागिरी येथे  सुरू झालेल्या उपकेंद्राच विकास करायचा आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी  मद्ये महाविद्यालयाचा पुढाकार राहील त्यासाठी विविध समितीची स्थापना करण्यात आली आहे . यासोबतच  विविध कार्याबद्दल कुलगुरू प्रो. मधुसदन  पेन्ना यांनी माहिती दिली. संधीचे सोने करून माझ्यावर विद्यापीठाने टाकलेला विश्वास पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास  देखील कुलगुरू महोदय यांनी व्यक्त केला.
या वेळी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालय चे कुलसचिव रामचंद्र जोशी,पी. आर. ओ. रेणुका बोकारे,पराग जोशी तसेच यावेळी विविध वृत्तपत्राचे पत्रकार  व मीडिया न्यूज चॅनल रिपोर्टर उपस्थित होते. संवाद साधत असताना  पत्रकारांनी विचारलेल्या विविध  प्रश्नांची उत्तरे कुलगुरू महोदय यांनी दिली. विश्वविद्यालयाच्या नवलोकीक हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूप घेण्याचा कार्य, खरा अर्थाने    कुलगुरू  प्रोफेसर मधुसूदन पेन्ना  यांनी  केलेला आहे ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे .आणि एकूणच दर्शन न्याय सिद्धांत या मध्ये त्यांचे कार्य खूप मोठा आहे यासोबत योगावर देखील त्यांच्या कार्य खूप चांगल्या पद्धतीचे आहे. त्यांची खाती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय या सर्वर यांची  त्यांची खाती आहे. रामटेक साथी विदर्भासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या व्यक्तीकडे अशा पद्धतीचे पूर्ण ज्ञान आहे अशा व्यक्तीकडे हे पद सध्या गेलेला आहे. आणि त्यातून नक्कीच विद्यापीठा ला नवी दिशा मिळेल आणि  विद्यापीठाला भावी आवश्यकता योग्य मार्गाने आणि उद्दिष्ट  मार्गाने होईल असा कुठला वाटत नाही त्यामुळे या विद्यापीठासाठी खूप मोठा भवितव्य आहे…असे कुलसचिव रामचंद्र जोशी  यांनी पत्रकार परिषदेत सांगितले…..
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मान्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक

Thu Jan 20 , 2022
 नागपूर, दि. 20 : नागपूर विभागातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2022-23 या प्रारुप आराखड्यास आज उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विभागातील भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यासाठीच्या अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला तर नागपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्याच्या आराखड्यास मुंबई येथे अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.             उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पध्दतीने नागपूर विभागातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!