संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामगढ येथील शिवली बौद्ध विहाराजवळ उभा असलेल्या दहा चाकी ट्रक च्या डिझेल टॅंक मधून चार चोरटे चोरी करीत असता रात्रगस्ती वर असलेल्या पोलिसांना पाहून भीतीपोटी चारही चोरट्याने चोरीच्या गुन्हयात वापरलेल्या स्विफ्ट कार ने घटनास्थळाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्वरित फिल्मी स्टाईल ने पाठलाग करून आरोपीस पकडण्यात यश गाठले यातील एक आरोपी ताब्यात आला असून इतर तीन आरोपी घटनास्थळाहून पळ काढण्यात यशस्वी झाले तर अटक एका आरोपी कडून 295 लिटर डिझेल किमती 26 हजार 550 रुपये,एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझार कार क्र एम पी 38 सी ए 0884 किमती 5 लक्ष रुपये,एक विवो कंपनीचा मोबाईल किमती 15 हजार रुपये ,9 प्लास्टिकच्या डबक्या किमती 2700 रुपये असा एकूण 5 लक्ष 44 हजार 250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यासंदर्भात फिर्यादी देवानंद पवार वय 30 वर्षे रा वरखेड तालुका अकोला ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम 379,34 अनव्ये गुन्हा दाखल केला असून अटक आरोपी चे नाव प्रणय रामचंद्र मेश्राम वय 23 वर्षे रा आशीर्वाद नगर,ताजबाग नागपूर असे आहे.ही घटना आज पहाटे साडे चार दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी 16 चक्कर ट्रक एम एच 40 सी ए 3817 सदर कामठी च्या घटनास्थळी उभा करून ट्रक च्या क्याबिन मध्ये झोपला असता ट्रक मधून होत असलेली हालचाल लक्षात घेता झोपेतून उठून ट्रक च्या खाली बघितले असता त्याच्या ट्रक च्या डिझेल टॅंक मधून चार इसम चोरी करताना दिसले त्या चोरट्याना प्रतिकार केले असता दरम्यान पोलिसांची गाडी दिसले तर ट्रक चालकाने पोलिसांची मदत घेतली तर चोरट्याने पोलीस बघताच कार ने पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून आरोपीस अटक करण्यात यश गाठले. व या कारवाहितुन एका आरोपीस अटक करीत त्यांच्याकडून 5 लक्ष 44 हजार 250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही यशस्वी कारवाही डीसीपी निकेतन कदम ,एसीपी विशाल क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक सुशील कोडापे,डी बी स्कॉड चे विशाल मेश्राम, राहुल वाघमारे,विशाल पौणिकर, लवकुश बानोसे, द्रोणा सव्वालाखे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.