नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये फ्युचर ॲथलेटिक्स क्लबची नेहा ढबालेने खुला महिला गटात सुवर्ण पदक पटकाविले. विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथील सिंथेटिक ट्रॅकवर ही स्पर्धा सुरु आहे. ४०० मीटर अडथळा (हर्डल्स) शर्यतीत नेहा ढबालेने १.०३.६८ मिनिट ही वेळ नोंदवून प्रथम स्थान प्राप्त केला. लक्षमेध फाउंडेशची पौर्णिमा उईके १.१२.८९ मिनिटांसह दुसऱ्या आणि अस्मिता चौधरी (१.२८.४९ मि) तिसऱ्या स्थानावर राहिली.
१८ वर्षाखालील मुलांच्या ४०० मीटर अडथळा (हर्डल्स) शर्यतीत प्रवीण राठोडने बाजी मारली. प्रवीणने ५८.७७ सेकंदात निर्धारित लक्ष्य पूर्ण करुन सुवर्ण पदकावर नाव कोरले. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. लक्षमेध फाउंडेशनच्या राहुल राऊत ने १.००.०४ मिनिटात अंतर पार करुन दुसरे स्थान पटकाविले तर रायजिंग स्प्रिंटर क्लबच्या देवांक मडावीला १.००.०५ मिनिटासह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय
१८ वर्षाखालील मुले उंच उडी
रेहान पटाईत (क्रीडा प्रबोधिनी) १.८० मि., आल्हाद राउत (आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूल) १.६५ मि., कार्तिक पेटकर (एचटीकेबीएस हिंगणा) १.६० मि.
१६ वर्षाखालील मुली उंच उडी
पुर्वा लोथे (लक्षमेध फाउंडेशन) १.४५ मि., नंदनी कोडवाले (एकलव्या ॲथलेटिक्स क्लब) १.४२मि., आस्था धुधकारे (वीर नॅशनल स्पोर्ट्स) १.३३ मि.
१८ वर्षाखालील मुली
४०० मीटर हर्डल्स
श्रेया इथापे १.०९ मि., मोहिनी बुराडकर (गुरुकुल ॲकेडमी) १.२६ मि., रितुजा मडावी (विद्यापीठ) १.२७ मि.
१८ वर्षाखालील मुले
४०० मीटर हर्डल्स
प्रवीण राठोड ५८.७७ से., राहुल राऊत (लक्षमेध फाउंडेशन) १.००.०४ मि., देवांक मडावी (रायजिंग स्प्रिंटर क्लब) १.००.०५ मि.
खुला गट महिला
४०० मीटर हर्डल्स
नेहा ढबाले (फ्युचर ॲथलेटिक्स) १.०३.६८ मि. पौर्णिमा उईके (लक्षमेध फाउंडेशन) १.१२.८९ मि., अ
स्मिता चौधरी (लक्षमेध फाउंडेशन) १.२८.४९ मि.