पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फासला..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 18:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी गावाजवळील चर्च समोर काही आरोपी दरोडा घालन्याच्या बेतात असताना ऐन वेळी पोलिसांनी पोहोचून सदर आरोपीना ताब्यात घेत दरोड्याचा प्रयत्न फासल्याची घटना गतरात्री 12 दरम्यान घडली असून यातील चार आरोपीना अटक करण्यात आले तर एक आरोपी पसार आहे.

अटक चार आरोपीमध्ये बादल संजय संतापे वय 20 वर्षे रा रमानगर कामठी,रुपेश उर्फ तट्या रालोकर वय 32 वर्षे,कळमना कामठी,आशिष उर्फ चिपड्या मामा बागडे वय 30 वर्षे रा जयभीम चौक कामठी ,मो जुबेर मो आरिफ वय 37 वर्षे रा नया गोदाम कामठी असे आहे तर पसार आरोपी चे नाव अश्फाक वय 35 वर्षे असे आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळी उपरोक्त नमूद आरोपी दरोडा घालण्याची व्युव्हरचना आखून कुठेतरी दरोडा घालण्याच्या बेतात असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे व सहकारी पथक रात्र गस्तीवर फिरत असताना सदर घटनेची कुणकुण पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाड घालून आरोपीना ताब्यात घेत त्यांच्याकडील दरोडा घालण्याच्या साहित्यातील 1 लोखंडी चाकू,एक लोखंडी तलवार,1 नायलॉन दोरी,1 स्टीलचा रॉड जप्त करण्यात आले.तर पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा प्रयत्न फासला हे इथं विशेष!

Next Post

युवा मोर्चाने संघर्ष करून संघटन वाढवावे; निश्चित फळ मिळेल - केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड

Sat Nov 18 , 2023
केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा वसा युवा मोर्चा ने घ्यावा – केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचे प्रतिपादन.. नागपूर –  २०२४ च्या महाविजयासाठी युवा मोर्चा ने सतर्क राहुन मंडल सशक्तिकरण करावे – भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री रोहित चहल यांचे प्रतिपादन. ४०० खासदार आणि २०० आमदार निवडून आणण्यात युवा मोर्चा सिंहाचा वाटा उचलेल – भारतीय जनता युवा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com