जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या पसार आरोपीस अटक करण्यात नविन कामठी पोलिसांना यशप्राप्त 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- एका 18 वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी देत सदर तरुणीवर बळजबरीने शारीरिक व लैंगिक अत्याचार केल्याची घटना 1 सप्टेंबर 2023 पासून ते 7 जून 2024 दरम्यान आरोपीच्या राहत्या घरात घडली असून या सतत च्या जाचक लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित 18 वर्षोय तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुरज खंडारे वय 29 वर्षे रा कपिल नगर नागपूर,हल्ली मुक्काम रमानगर कामठी विरुद्ध भादवी कलम 376,2,एन ,354,(ड),506 ब,भादवी सह 4,6,8,10 व 12 पोकसो अधिनियम अनव्ये गुन्हा 12 जून 2024 ला दाखल केला केला होता मात्र आरोपी अटकेबाहेर असल्याने पोलिसांनी तांत्रिक व खबरीच्या आधारे तर्कशक्तीच्या आधारावर सदर आरोपीचा शोध लावून अटक करण्याची यशस्वी कारवाही 7 ऑगस्ट ला केली.उल्लेखनीय आहे की सदर अटक आरोपी कळमना पोलीस स्टेशन च्या घरफोडी प्रकरणातही पसार होता.

ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव, पोलीस उपनिरीक्षक सुशील कोळापे, पोशी/राहुल वाघमारे, नसीम अंसारी, हेमचंद सोनवणे, आशिष पिपरहाटे यांनी केली असूनपु ढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एक सर्वसामान्य व्यक्ती मुख्यमंत्री बनते ही भारतीय लोकशाहीची महानता - राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

Fri Aug 9 , 2024
ठाणे :- भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानले जाते. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी येथे केले. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा.डॉ.प्रदीप ढवळ आणि डॉ.अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित “योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे” चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!