राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित प्रचार व्हॅनचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

चंद्रपूर – भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत प्रादेशिक जनसंपर्क कार्यालय, वर्धा यांच्या वतीने चंद्रपूर शहरात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित जनजागृती व्हॅनचे 12 जानेवारी 2022 रोजी महानगरपालिका मुख्य कार्यालयासमोर महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले.
25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्त “सक्षम युवा आणि सशक्त युवा” हे ब्रीद घेऊन क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो वर्धा तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने ‘आजादी का अमृत महोत्सवा’च्या औचित्य साधून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
महापौर राखी कंचर्लावार यांच्या हस्ते नारळ फोडून व हिरवी झेंडी दाखवून यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सभागृह नेता देवानंद वाढई माजी महापौर अंजली घोटेकर, नगरसेविका संगीता खांडेकर, डॉ. भारती दुधानी, राजेंद्र खांडेकर, सुशील सहारे यांची उपस्थिती होती.
हे जनजागृती व्हन चंद्रपूर शहरातील विविध भागात फिरून कोरोनासंदर्भात लोकांना जागृत करणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

आर. डी. बर्मन ने गीतों से सजी संध्या हार्मोनी इवेंट्स का संगीत शो 

Wed Jan 12 , 2022
नागपुर – विख्‍यात संगीतकार आर. डी. बर्मन ने पने संगीत की जादू से तीन पीढ़ियों को आनंद दिया है । उन्‍होने संगीत दिये ऐसेही कुछ गीतों को प्रस्‍तुत कर गायकोंने हार्मोनी इवेंट्स प्रस्तुत ‘आर. डी बर्मन प्लेटिनम कलेक्‍शन’ यह प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन द्वारा संगीत दिये गये गीतों का कार्यक्रम  प्रस्‍तुत किया गया । इस कार्यक्रम की संकल्पना हार्मोनी इवेंट्स के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com